Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.09.2006

हुश्श...रोज ब्लॉग लिहीन म्हणण सोप पण आचरणात आणण महा कर्मकठीण!वेळ मिळत नाही ही सबब पुरेशी नाही ...आजपासून रोजच्या घडामोडींवरील भाष्य करायचा प्रयत्न करतो!


सध्या क्रीकेट पण बन्द आहे .. जगभरातले खेळाडू सध्या अति-क्रिकेट च्या नावानी बोंब मारताहेत ... सेहवागने पण ही बोंब मारावी म्हणजे अतीच झाले! त्याच्या सारख्या "प्रेक्षक मैदानात येण्यापुर्वीच आपण तंबूत जाउन बसणे" हे ब्रीदवाक्य असलेल्या खेळाडूला कसला आलाय अति-क्रिकेट चा त्रास?प्रमोद महाजनांवर हल्ला झाला त्या दिवशी मामाचा फोन ...
मामा : "काय रे घोडा वगैरे आहे का तुझ्याजवळ?"
मी : "नाही ...अजुन तरी नाही"
मामा : "बर झाल ... मी अर्ध्या तासात तुला भेटायला येतोय"

कलियूग आलय हेच खर!


अमिताभ बच्चन ने स्वत: शेतकरी असल्याचा पुरावा न्यायालयात मांडला ...तो "एन.आर.आय." होताच, आता "एन. आर. आय. शेतकरी" झाला!या देशात धनिकांना सगळ शक्य आहे ...सर्व काही माफ़ आहे ....पुढची पायरी? "दारीद्र्‌य-रेषेखालील एन.आर.आय. शेतकरी" ( शेतजमीन विदर्भातली ... अनुदान लाटायला मोकळे! )

आजच्या पुरते एवढेच ... :-)

1 Comments:

Blogger Nikhil Deshpande said...

are mamani kharech vichrale ka ghoda bida aahe ka? .........

11:18 AM  

Post a Comment

<< Home