Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.25.2006

पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे ...

3 Comments:

Blogger Nandan said...

Bhedak kavitaa. Then they came for me, (and by that time there was no one left to speak up for me} hee dusaryaa mahayuddhanantar lihilee geleli prasiddha kavitaa aaThavali yavaroon.

6:09 PM  
Blogger Sameer said...

दुर्दैवाने ही कविता मी केली असल्याचा कुठलाही लेखी पुरावा माझ्याजवळ नाही.
बस मध्ये माशा मारत बसण्यापेक्षा मनात आलेले विचार मोबाईलच्या एस.एम.एस. लिहायच्या 'एडीटर' मध्ये लिहून नंतर ब्लॉग वर टाकले!
असो ...
दुस-या ब्लॉगवर, लोकांच्या ऑरकूट स्क्रॅपबूक मध्ये ई. ठिकाणी ही कविता पोचलीय यातच मला आनंद आहे ...
आपले विचार लोकान्च्या काळजाला साद घालु शकतात याचा याहून मोठा पुरावा कुठला!
धन्यवाद!

10:18 AM  
Blogger Sachin Rewaram Gaikwad said...

sameer ...khoopch chaan lihali aahes kavita!!
keep it up !!

12:21 AM  

Post a Comment

<< Home