anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

4.21.2006

खुप दिवसांपासून ठरवत होतो आपणही काही लिहाव म्हणून ... पण योग जुळून येत नव्हता ...मनात एक विचार होता की ज्या आठवड्यात भारतीय क्रीकेट संघ एकही सामना खेळणार नाही त्या आठवड्यात आपल लिखाणकाम सुरु कराव!आता 'लिखाणयोग' अश्या अशक्यप्राय गोष्टींवर अवलंबून ठेवला तर काय होत याचा प्रत्यय आलेला आहे! म्हणून आपण ठरवून टाकलय, यापुढे सेहवाग एक आकडी धावसंख्येवर बाद होईल तो मुहुर्ताचा दिवस मानण्यात येइल!(हे बहिणीला कळायला नको... नाहीतर ती पण मॅच लावण्यावरुन आमच्यात होणार युद्ध विसरून सेहवाग ची "फ़ॅन" होइल ...कारण मुहुर्त म्हंटला म्हणजे खरेदी आली न! ;-) ... पैसे देण्यास भाऊ समर्थ आहे! )
क्रीकेट हा माझा अत्यन्त जीव्हाळ्याचा विषय आहे. तसा तो सर्वच भिड्यांचा आहे.माझ्या आजोबांची जी अंधूकशी छबी माझ्या डोळ्यासमोर आहे तिच्यात त्यान्नी स्वत:च्या हाताने केलेल्या तुळतूळीत टकलाशिवाय लक्षात राहण्यासारखी एकमेव गोष्ट म्हणजे खास क्रीकेट कॉमेंट्री ऐकण्यासाठी कानापाशी लावलेला मोठा स्पीकर!
वाइट एकाच गोष्टीच वाटत ...काही जणान्च्या डोळ्यासमोर आहे स्वत:ची कौतुकाने घास भरवत गोष्ट सान्गणारी पणजी आज्जी! आणि आमच्याकडे आहे आजोबांपेक्षा ठसठशीतपणे आठवणारा काळा स्पीकर!सगळ्यांन्ना आजी-आजोबा काय चीज असते याचा प्रत्यय का मिळू देत नाहे "तो"?