anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

8.27.2006

देशाचा स्वातंत्र्यदिन होवून एक आठवडा नाही होत तोच देशातील लोकशाही अधिकार पद्धतीत लोकांच्या प्रतिनिधींचे व्यासपीठ असलेल्या लोकसभेत एक अत्यंत लज्जास्पद प्रकार घडला.

या देशाच्या सरकारमधील 'रेलवे' हे एक अत्यंत महत्वाचे खाते सांभाळणा-या लालू प्रसाद यादव यांनी भर सभाग्रुहात एका विरोधकाला शिवीगाळ केला. तसेच त्यांचे मेहुणे साधू यादव यांनी तर चक्क त्या विरोधकाला ठोसा मारायचा प्रयत्न केला!

लोकसभेचा आखाडा करणा-या या लोकान्ना पाहून मनात काही प्रश्न उपस्थीत होतात. माझे नाव उद्धव नसल्याने असेल कदाचीत, पण मला 'राज'कारणात विशेष गती नाही. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे जर कुणाला माहीत असतील तर मला जरूर कळवा.

१. लोकसभेची निवडणूक लढवायची झाल्यास पात्रता अटींमध्ये किमान किती शिव्या याव्यात अशी अपेक्षा आहे?
२. मात्रुभाषेतील शिव्यांचे ( ज्याला आम्ही 'गावठाण शिव्या' म्हणतो ) न्यान ग्रुहीत धरले जाईल का?
३. संसदे-मध्ये हाणामारी करण्याऐवजी सरकार एक 'सर्वपक्षीय लोकतांत्रीक हाणामारी स्पर्धा' का आयोजीत करत नाही?
४. एखाद्या आमदाराने विरोधकांचा काटा काढायला महाभारतात द्यायचे तसे द्वंदाचे आव्हान दिले तर ते स्वीकारावे का?
५. दूरदर्शनने डी.डी. राज्यसभा व डी.डी. लोकसभा ह्य दोन स्वतंत्र वाहिन्या सुरू केल्यापासून हाणामारीचे प्रकार वाढले आहेत का? या सर्व प्रकारामागे या वाहिन्यांचे 'टी.आर.पी.' रेटींग वाढवण्याचा उद्देश आहे का?
६. तसे असल्यास या हाणामारीत अधीक नाट्यमयता आणण्यासाठी सरकार 'टेन स्पोर्ट' वरील 'डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़.' या संस्थेशी काही बोलणी का करत नाही?
७. लोकसभेचे कामकाज बघणा-या सामान्य माणसाकडून सरकार 'करमणूक कर' तर गोळा करणार नाही ना?
८. लोकसभेत 'मल्लांसाठी' आरक्षण आणावे का? ते दिल्यास सनी देवल, सुनील शेट्टी, गुड्डी मारुती अश्या तगड्या(अभिनयात नाही!) कलावंतांना कोणते राजकीय पक्ष आपल्याकडे खेचून घेतील?
९. सर्व आमदारांना व खासदारांना यापुढे 'व्यायामशाळा भत्ता' व 'सुका-मेवा भत्ता' व काही खास लोकांच्या आग्रहास्तव 'चारा भत्ता' देण्यात येइल का?

प्रश्नांची यादी तशी फ़ार मोठी आहे ...पण वरच्या सर्व प्रश्नांपेक्षा या एका शेवटच्या प्रश्नाच उत्तर मिळाल असत तर बर झाल असत अस वाटतय ...

ज्या देशात एका रेलवे अपघाताची नैतीक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारा स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या सारखा रेलवे मंत्री निवडून येतो, त्याच देशात लोकसभेत जाउन नैतीकता हा शब्द कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसेल असे वाटायला लावणारे वर्तन करणारा रेलवे मंत्री निवडून यावा ही लोकशाहीची चेष्टा नाही का?