Name:
Location: Pune, Maharashtra, India

12.22.2006


कदाचीत आयुष्यात पहिल्यांदाच मी अभ्यास सोडून बाकी कशात बक्षीस पटकवलय. तस पाहिल तर अखिल भारतीय टोपे-नगर गणेशोत्सव मंडळा तर्फ़े घेतलेल्या ८ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत मी एकदा तिसरा आलोय ! (तेव्हा तीन स्पर्धकांमध्ये रांउड-रॉबीन पद्धतीने सामने खेळवण्यात आले होते असही अंधूक अंधूक आठवतय!)

तर या वर्षी आमच्या 'प्रॉडक्ट ग्रूप' ने सप्टेंबर महिन्यात गोव्यात सहल नेली होती. तेव्हा १५ दिवस आधीपासून जोरदार प्रचार, विविध स्पर्धांच्या घोषणा यांनी ऑफ़ीस अगदी दणाणून गेल होत. जवळपास २०० लोक तरी येणार होते!

सहलीच्या पहिल्या दिवसाच आकर्षण ठरली ... गोव्यातील अति-वृष्टी! सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र धो-धो-धो-धो ...!!!

पण त्या दिवशी माझ लक्ष वेधून घेतल होत एका साधारण दीड वर्षाच्या गोंडस मुलिनी! कंपनीतल्याच कुण्या कर्मचा-याची मुलगी ..भारी गोड आणि हसतमुख! नाव काय तर म्हणे ऍलीस! तिच्या बाल-क्रीडा बघण्यात आणि थोड्याफ़ार बालक्रिडांमध्ये मी भाग घेतला! मी बालक्रिडेत दंग असताना काही जण बिकीनी घातलेल्या जलप-यांबरोबर जलक्रीडा करुन आले होते हे मला नंतर समजले! "जे होत ते भल्यासाठीच" अशी मी स्वत:ची समजूत घातली!

तसा आमच्या कंपनीने आयोजीत केलेल्या 'कोडॅक (इंग्रजीत याच स्पेलींग सी नी सुरु होत का के नी हे ही मला धड ठाउक नव्हत! आमचे खास दोस्त ओजस सबनीस यांनी मेल करुन ते कळवले! सबनीस, संस्था आभारी आहे! ) मोमेंट' छायाचित्र स्पर्धेचा उत्साह पुर्ण सहलभर जाणवत होता. लोक संधी मिळेल तिथे फोटो काढत होते! त्याच निमित्ताने मित्रांनी आजपर्यन्त फक्त ऑर्कूट वरच बघितलेल्या अनेक मुलींचे फोटो काढून घेतले!

मी पण त्या पावसाळी दुपारी सहज हॉटेलात फिरत असताना मला आमच्या एका मित्राची मुलगी रिया त्या छोट्या ऍलीस बरोबर खेळताना दिसली. लहान मुलांचा निरागस भाव कॅमेरात टिपावा या सहज भावनेनी मी बटन दाबल. खर तर रिया ऍलीस चा गालगुच्चा घ्यायच्या वेळचा फोटो काढायचा माझा प्रयत्न होता पण ती वेळ बरोब्बर साधता आली नाही.

असो! "निरागस बाला" या शिर्षकाबरोबर दिलेल्या या फोटोने चक्क कोडॅक मोमेंट स्पर्धेत प्रथम पारितोषीक पटकवले!

या लहान मुलांच्या निरागसतेला माझा धन्यवाद! आणि हो, या स्पर्धेसाठी जे कोणी पंच असतील त्यांच्यातल्या स्त्री पंचांना सुद्धा धन्यवाद! ( कारण हा फोटो मी ज्या ज्या ओळखीच्या स्त्रीयांना दाखवला होता त्या त्या सर्व स्त्रीयांनी "चो च्वीट" असा चित्कार काढल्याचे पाहून मी मनोमन "पंचांमध्ये स्त्रीया असल्यास बक्षीस मिळायची शक्यता आहे!" हा अंदाज आधीच बांधला होता! ;-) ))

1 Comments:

Blogger peshwa said...

mast.. abhinandan.. donhi karta-
paritoshik ani sundr lekh..

6:23 PM  

Post a Comment

<< Home