Name:
Location: Pune, Maharashtra, India

1.20.2007

आजचा दिवसच भारी होता!आज सकाळी कंपनीत जायला चटकन बस मिळाली.कंपनीत एकही मिटींग झाली नाही.साहेब दौ-यावर होता.जेवणात गोडाचा शीरा होता!संध्याकाळी इंद्रायणी एक्स्प्रेस पकडायची असल्याने ऑफ़ीसातून पाचलाच निघालो तर समोरच मित्र त्याची चारचाकी घेऊन उभा! मग त्यानी पुणे स्थानकापर्यंत सोडल.

६:०० ला फलाटावर पोचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला! इंद्रायणी समोर उभी होती आणि तिचे सर्व दरवाजे उघडे होते आणि आतले दिवे पण चालु होते! इंद्रायणी ६:३४ ला म्हणजे नियोजीत वेळेच्या एक मिनिट आधीच निघाली.गाडीत मला खिडकीची जागा मिळाली. बाजुला एक मध्यमवयीन जोडप बसल होत. बाई आणि बुवा या दोघांपैकी कोणीही 'सुटलेल' नव्हत. तिघांसाठी तयार करण्यात आलेल्या त्या बाकड्यावर पहिल्यांदाच तीन लोक विनासायास बसले!गाडीत भिकारी-टाकारी, गाणी म्हणून पैसे मागणारे, कचरा लोटत लोटत आपल्या जागेखाली ढकलून तोच साफ करण्याचे पैसे मागणारे असे फार थोडे ( प्रत्येकी एक ) लोक आले! एकही हिजडा आला नाही!

गाडीत तिकीट-तपासनीस आले! सगळ्या उतारुंकडे तिकीटे होती. कोणीच हुज्जत घालत नव्हते! माझ्या नजरेसमोर कोणतीच सुंदर ललना नव्हती आणि कायम अश्या सुंदर स्त्रियांबरोबर असतो असा अंगरक्षकही (याला हल्ली 'बॉयफ्रेंड' म्हणतात) नव्हता. मुख्य म्हणजे रेलवेच्या संडासाच्या कड्या लागत होत्या आणि संडासात भरपूर पाणी पण होत. आजुबाजुला एकही किरकीरणार आणि 'पोकेमॉन' साठी हट्ट करणार लहान मूल नव्हत! बाजूची दोन माणस रामायणातल्या 'सूग्रीवकांडा'वर वैन्यानीक दृष्टीकोनाने चर्चा करत होती.

मुंबईला पोचल्यावर माझ्या हच मोबाईलने कुठलीही कटकट न करता झटकन 'नेटवर्क' ला आपलस केल! लोकलच्या तिकीटावरून मारामारी, वादावादी झाली नाही. फलाटावर उतरताच समोरच "बोरीवली स्लो" उभी ठाकली. मी चढलेल्या डब्यात इतकी तुरळक लोक होती की मला "ही बांद्रा लोकल तर नाही ना?" हे विचारून घ्याव लागल. लोकल मध्ये मराठीतल्या विविध बाराखड्यांचा उद्धार करत 'मेंढीकोट' खेळत बसलेले चार लोक सुद्धा सापडले!बोरिवली लोकल कांदीवली ते बोरीवली दरम्यान न थांबता बोरिवली स्थानकात शिरली! घराच्या रस्त्याने जाणारी बस बोरिवली स्थानकाच्या बाहेरच सापडली. आणि आमच्या श्रीकृष्ण नगराच्या वेशीवरच एक अतिशय सुंदर मुलगी अगदी रोजची ओळख असल्यासारखी संपूर्ण बत्तीस दात दाखवत ( आडव केळ तोंडात घातल्यावर माणूस जसा दिसेल तश्या बेताने ) हसली! हाय .. ती पाहताच बाला ... कलीजा खलास झाला ...!!

सगळ स्वप्नवतच वाटतय न? इथे मला कुठेही पानचट धक्कातंत्राचा वापर करायचा नाही, वर लिहीलेला शब्द न शब्द खरा आहे!भारतात राहणा-या माणसाच्या आणि ते सुद्धा माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या वाट्याला असा दिवसही येउ शकतो यावर लोकांचा कशाला माझाच स्वत:चाही विश्वास बसत नाहीये आणि हे जर स्वप्न असेल तर मी "समीर ऊठ १२ वाजले गधड्या" ही हाक ऐकू यायच्या आतच सगळ लिहून ठेवतो! :-)

9 Comments:

Blogger Nandan said...

बोरिवली लोकल कांदीवली ते बोरीवली दरम्यान न थांबता बोरिवली स्थानकात शिरली. ha ha :)

4:07 AM  
Blogger रोहिणी said...

फार छान लिहिलं आहे... कधि कधिच असा सुदिन उगवतो... मस्त...

3:28 PM  
Blogger निखिल said...

Lai bhari lihale aahe ki ho Asech lihit ja kharach swapna navhata na?

11:27 AM  
Blogger Vidya Bhutkar said...

धक्कातंत्राचा वापर नव्ह्ता हे आवडलं नाहीतर शेवटी स्वप्नं असतं तर भारतीयांना या गोष्टी स्वप्नवतच आहेत असं वाटून उगाचच हुरहूर वाटलई असती.
:-)
'बोरिवली लोकल कांदीवली ते बोरीवली दरम्यान न थांबता बोरिवली स्थानकात शिरली.' असं झाल्यावर्चा आनंद किती असतो ते आठवलं. :-)

10:47 PM  
Blogger Monsieur K said...

a wonderful day indeed!
tujhyaa aayushyaat ase anek su-din yeu det, heech prabhu-chrani praarthana karto!

~ketan

2:29 AM  
Blogger sandeep amrtikar said...

This is good writing by u.
sorry but one mistake by me that please give u r mail address ,i am freind of u from school days i.e. from vanita samaj highschool amaravati

5:01 PM  
Blogger Unknown said...

This comment has been removed by the author.

8:02 PM  
Blogger Unknown said...

Chhan lihit aahat tumhi... Lihit ja.

8:03 PM  
Blogger madhura said...

mast lihil aahe.

7:31 PM  

Post a Comment

<< Home